'कोरोनाची दहशत.'
दिसणारे सगळे शत्रू ,
हरवले आहेत माणसाने.
न दिसणाऱ्या शत्रूंना हि,
हरवलय बऱ्यापैकी त्यानं.
तसं पाहिलं तर,
शत्रूंना संपवायचं कसं?
याचा प्रदीर्घ इतिहासच,
लिहिलाय त्यानं. फक्त आपल्याच फायद्यासाठी ,
कुठल्याही थराला जाणारा,
निसर्गाला वेठीस धरून,
प्राण्यांना दावणीला बांधणारा.
हताश, हतबल होऊन,
सैरावैरा पळतोय सुसाटपणे...
मारायला.. मुळीच नाही,
स्वतः ला वाचवन्यासाठी...संपण्यापासून.
प्राणी आहोत हेच ,
तो विसरलाय बऱ्यापैकी.
म्हणूनतर प्राण्यांच्या रोगांना ,
बळी पडतोय बिचारा...
चंद्रावरची माती आणली,
चाललीय तयारी त्याची...
मंगळावर पाणी शोधून ,
शेती करायची..........
न दिसणारा विषाणूही,
पळवतो त्याला कधी - कधी.
जिवाच्या आकांताने.. वाचण्यासाठी,
अगदी ऊर फुटेस्तोवर.
पळता पळता तो,
चघळतोय नवीन औषध.
'कोरोना 'ला मारणाऱ्या बाटलीतील,
तोंडाला फेस आला तरी...
पण तो विसरलाय,
कोरोनाचा जुळा भाऊ,
भविष्यात येऊ शकतो,
आतासारखाच मागल्या दारानं....
आता तो सारखा....
' मी सुधारणार'... म्हणतोय .
'जीवो जीवश्च जीवनम'.
तत्व अंगिकारणार म्हणतोय.
प्रदीपकुमार भांदिगरे.